मुंबई : अवघ्या 500 रुपयांत महिनाभर लोकलने कुठेही फिरण्याचा प्रस्ताव रेल्वेच्या विचाराधीन आहे. रेल्वे बोर्डाने हिरवा कंदील दाखवल्यास उपनगरीय रेल्वेच्या मार्गासाठीचा समावेशक पास काढण्याची सुविधा रेल्वे प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या 500 रुपयांच्या मासिक पासच्या आधारे प्रवाशाला महिनाभर मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर अशा मार्गांवर कितीही वेळा फिरता येणार आहे. 


व्दितीय श्रेणीसाठी 500 रुपयेत तर प्रथम श्रेणीसाठी मासिक पाससाठी 1500 रुपये मोजावे लागणार आहे. मुंबई रेल्वे विकास प्राधिकारणाने रेल्वे बोर्डाकडे हा प्रस्ताव पाठवला आहे. प्रस्ताव मान्य झाल्यास हि पास सुविधा प्रवाशांना उपलब्ध होईल.