युती होणार की नाही हे उद्या ठरणार
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपची युती होईल की नाही हे उद्याच्या शिवसेनेच्या मेळाव्यात स्पष्ट होईल.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपची युती होईल की नाही हे उद्याच्या शिवसेनेच्या मेळाव्यात स्पष्ट होईल.
शिवसेनेनं भाजपला 95 जागा देऊ केल्या असल्या तरी भाजपनं शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवक असलेल्या 40 जागांवर दावा ठोकल्यामुळं युतीवर टांगती तलवार आहे.
युती होणार नसेल तर ती मैत्रिपूर्ण वातावरणात तोडण्याचा निर्णयही दोघा पक्षांनी घेतल्याचं समजतंय. मातोश्रीवर आज पिंपरी-चिंचवडच्या शिवसेना नेत्यांची युतीबाबत बैठक झाली. मात्र बैठकीनंतर कोणतंही भाष्य करण्यास नेत्यांनी नकार दिलाय.
युतीबाबत उद्याच काय ते समजेल, असं विनायक निम्हण यांनी स्पष्ट केलं. बैठकीला आमदार नीलम गोऱ्हे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विनायक निम्हण, डॉ. अमोल कोल्हे हे उपस्थित होते.