जून्नर : एकीकडे सरकार स्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे, बेटी बचाओ बेटी पढाओचा नाराही दिला जातोय. पण याला काळीमा फासणारी घटना जून्नर येथे घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन लहान मुलींना त्यांच्या जन्मदात्या आई-वडिलांनी अज्ञात स्थळी सोडून दिल्याची ही धक्कादायक घटना जून्नर येथील आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडीत घडली. या मुली इतक्या लहान आहेत की त्यांना त्यांची पूर्ण नावेही सांगता येत नाही आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटणे अवघड झाले आहे. 


एकीचे वय 3 तर दुसरीचे पाच वर्षे आहे. सध्या या मुलींचा सांभाळ गावातील केदाली दांपत्य करत आहे. पोलिसांना याची माहिती देण्यात आलीये. मात्र घटना नेमकी कुणाच्या हद्दीत घडली, या वादात पोलीस अडकल्याने मुलींच्या मातापित्यांचा छडा लावण्यास अजूनही सुरूवात झालेली नाही...