बिग बॉसच्या घरातील लोकांना ही गोष्ट माहितीच नाही
सरकारने 500 आणि 1000 च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर सर्वच ठिकाणी चर्चांना उधान आलं आहे. वर्तमानपत्र, रेडिओ, टीव्हीवरुन यासंदर्भात नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. सोशल मीडियावरून देखील अनेक घटना, जोक्स व्हायरल होत आहेत. परंतू या सर्व घटना माहित नसलेले देशात 12 लोक आहेत. त्यांना माहितीच नाही की, त्यांच्या कडील 500 आणि 1000 च्या नोटांना आता काहीच किंमत राहणार नाही आहे.
मुंबई : सरकारने 500 आणि 1000 च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर सर्वच ठिकाणी चर्चांना उधान आलं आहे. वर्तमानपत्र, रेडिओ, टीव्हीवरुन यासंदर्भात नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. सोशल मीडियावरून देखील अनेक घटना, जोक्स व्हायरल होत आहेत. परंतू या सर्व घटना माहित नसलेले देशात 12 लोक आहेत. त्यांना माहितीच नाही की, त्यांच्या कडील 500 आणि 1000 च्या नोटांना आता काहीच किंमत राहणार नाही आहे.
जगातील धावत्या घडामोडींची माहिती नसणारा रिआलिटी शो 'बिगबॅास' च्या घरात सहभागी स्पर्धकांना घराबाहेर पडल्यावर जबरदस्त धक्का बसणार आहे. 'बिगबॅास' कार्यक्रम होस्ट करणार अभिनेता सलमान खान प्रत्येक रविवारी सहभागी स्पर्धकांसोबत गप्पा मारतो, मागच्या रविवार अशाच गप्पा मारत असताना त्याने सहभागी स्पर्धकांना नोटबंदीच्या निर्णयाचा एक संकेत दिला. सलमाने सहभागी स्पर्धकांना प्रश्न विचारला की, तुमच्याकडे 500 आणि 1000 च्या किती नोटा आहेत ?
त्यावर सहभागी स्पर्धक खूप नोटा आहेत असे म्हणाले.
'बिगबॅास 10' च्या सर्व सहभागी स्पर्धकांना देखील पैसे जमा करण्यासाठी आणि भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंतच वेळ आहे. अशावेळी शोमधून बाहेर होणेच त्याच्यासाठी फायद्याचे आहे. 'बिगबॅास 10' मधून मागील आठवड्यात बाहेर झालेल्या नवीन प्रकाश या स्पर्धकाने ट्विट केलं की, माझ्याकडे सर्व 1000 आणि 500 च्या नोटा असल्यामुळे मी काहीच खरेदी करू शकत नाही आहे. सरकारच्या या निर्णयाचे सुपरस्टार रजनीकांत, अमिताभ बच्चन, करण जौहर, सलमान खान, अनुराग कश्यप समवेत अनेक बॅालिवूडमधील नावाजलेल्या कलाकारांकडून स्वागत करण्यात आले आहे.