मुंबई : क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं असं म्हणतात पण ४ वर्षाच्या मुलाची अंडर १२ संघात निवड होऊ शकते हे थोडं आश्चर्यकारकच आहे. वंडर बॉयच्या नावाने प्रसिद्ध ४ वर्षाचा शायन जमाल जेव्हा ३ वर्षाचा होता तेव्हा त्याने क्रिकेट खेळणं सुरु केलं आणि एका वर्षात त्याने आपली जागा बनवली.


जमाल हा खूप सुंदर कवर ड्राइव्ह खेळतो आणि त्याचा फॉरवर्ड डिफेंसही मजबूत आहे. दिल्लीतील संगम विहार येथील हमदर्द पब्लिक स्कूलमध्ये केजीमध्ये शिकतो. हा चिमुरडा विराट कोहलीचा मोठा फॅन आहे. शायनला त्याचे वडील अरशद जमाल हे क्रिकटचे धडे देतात जे स्वत: एक क्लब क्रिकेटर राहिले आहेत. आणि सध्या ते एक बिझनेसमॅन आहेत. जमालला विराट सारखं बनण्याची इच्छा आहे.