मुंबई : भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा येत्या १७ एप्रिलला त्याची मैत्रिणी रिवाबा सोलंकी हिच्याशी लग्नगाठ बांधतोय. या दोघांनी पाच फेब्रुवारीला साखरपुडा केला होता. त्यांच्या लग्नाची पत्रिकाही छापण्यात आलीये. मात्र त्याच्या होणाऱ्या बायकोबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता जडेजाच्या फॅन्सना आहे. 


१. हा आहे रिवाबाचा परिचय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२. रिवाबा सोलंकी काँग्रेस नेत्याची भाची आहे. 


३. रिवाबाचे काका हरिसिंग सोलंकी गुजरात काँग्रेसचे डेलिगेट आणि राजकोट शहराचे मंत्री आहेत.


४. रिवाबाने इंजीनियरिंगमध्ये शिक्षण घेतलेय. सध्या ती यूपीएससीची तयारी करतेय. 


५. रिवाबाचे कुटुंबिय राजकोटच्या कालवाड रोड स्थित सरिता विहार सोसाटीत राहतात. 


६. रिवाबा तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तिची आई प्रफुल्ला राजकोट रेल्वेत काम करतात. 


७. रिवामा सध्या यूपीएससीची तयारी करतेय मात्र तिला क्रिकेटमध्ये रस नाही.


८. मॅकेनिकल इंजिनियर असलेली रिवाबा जडेजाची बहीण नयनाची चांगली मैत्रिण आहे.