मुंबई : आयपीएल २०१६ मध्ये विस्फोटक फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांचं मन जिंकणारा दक्षिण अफ्रिेकेचा खेळाडू एबी डिविलियर्सने भारतीय नागरिकता मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेटण्याची इच्छा वर्तवली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणाऱ्या डिविलियर्सला यंदाचा आयपीएल सीजन चांगला राहिला. पण ही गोष्ट त्याने मस्करीमध्ये म्हटली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरसीबीचा डिजिटल टीमचा सदस्य मिस्टर नागने जेव्हा डिविलियर्सला विचारलं की, 'तु अधिक वेळ हा भारतात घालवतो मग तू भारताचं नागरिकत्व का स्विकारत नाही?' यावर डिविलियर्सने म्हटलं की, मला याबाबत पंतप्रधानांशी बोलावं लागेल.'


डिविलियर्सने विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर भारतात देखील अनेक चाहते मिळवले आहेत. त्याने जरी ही गोष्ट मस्करीमध्ये म्हटली असली तरी ती अनेकांना आवडली असेल. 


पाहा व्हिडिओ