रिओ :  रिओ ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या पदकाची आशा गोल्डमन अभिनव बिंद्रा याने कायम ठेवल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज झालेल्या या स्पर्धेत अभिनव बिंद्रा याने ६२५. ७ गुणांसह सातवा क्रमांक मिळवून फायनलमध्ये धडक मारली आहे. 


ऑलिम्पिक रेकॉर्ड 


याच प्रकारात पहिल्या क्रमांकावर असलेल्या इटलीच्या निकोलो कॅप्रानी याने  ६३०.२ गुण करत ऑलिम्पिक रेकॉर्ड केले आहे. 


गगन नारंगने केली निराशा 


या स्पर्धेत भारताचा आणखी एक खेळाडू गगन नारंग देखील होता. पण त्याने निराशा करत केवळ ६२१ .७ गुणांसह २३ व्या स्थानावर फेकला गेला.