नवी दिल्ली : भारताची युवा गोल्फर आदिती अशोकनं इंडियन ओपन जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. तिने दिल्लीमध्ये झालेल्या या टुर्नामेंटमध्ये बाजी मारत इतिहासाला गवसणी घातली. युरोपियन टुर्नामेंट जिंकणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फर ठरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिओ ऑलिम्पिकमध्ये आदितीनं ऐतिहासिक कामगिरी करत तिनं अवघ्या क्रीडा जगताचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. ऑलिम्पिकमधील देदिप्यमान कामगिरीनंतर आदितीकडून तिच्या चाहत्यंना मोठ्या अपेक्षा आहेत. आदितीनं इंडियन ओपन जिंकत आपली दखल सा-यांनाच घ्यायला पुन्हा एकदा भाग पाडलंय. आता आगामी काळात तिच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.