नवी दिल्ली : नरसिंग यादव बाबत सर्वात मोठी बातमी हाती आली आहे, नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्याची ओळख पटली आहे.  नरसिंगच्या जेवणात उत्तेजक द्रव्यांची भेसळ करून त्याला बाद करण्याचा हा कट असण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. कॅम्पातील खानसामन्याने फोटो पाहून त्या व्यक्तीची ओळख पटली आहे. या व्यक्तीला नरसिंग यादवच्या रूममध्ये पाहिले आहे. हा व्यक्ती दिल्लीच्या छत्रसाल स्टेडिअमशी संबंधित आहे. 


एका आंतरराष्ट्रीय मल्लाशी संबंधीत हा व्यक्ती आहे. तो १२० किलो वजनी गटात कुस्ती खेळतो. त्याचा हा छोटा भाऊ आहे. 


नरसिंग यादव याने या मुलासह अनेक जणांचे नाव आपल्या तक्रारीत घेतले आहे. त्याच्या विरोधात आज एफआयआर दाखल केली आहे.  उद्या ही एफआयआर सुनावणीवेळी नरसिंगच्या बाजूने जाणार आहे. त्याने सांगितले की त्याला फसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आधारावर नरसिंगचा पक्ष मजबूत होऊ शकतो.  


या प्रकरणी नाडा समिती या प्रकरणावर अखेरचा निर्णय घेणार आहे. नरसिंग यादवला आपली बाजू मांडण्यासाठी ४८ तास देण्यात आले आहेत.