बीसीसीआयची सूत्र सांभाळण्यासाठीची नऊ नावं सुप्रीम कोर्टात सादर
सुप्रीम कोर्टात नेमलेल्या अॅमिकस क्युरीनं बीसीसीआयच्या प्रशासकपदासाठी नऊ सदसस्यांची नावं सुप्रीम कोर्टाला सोपवली आहेत.
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात नेमलेल्या अॅमिकस क्युरीनं बीसीसीआयच्या प्रशासकपदासाठी नऊ सदसस्यांची नावं सुप्रीम कोर्टाला सोपवली आहेत. मात्र, प्रशासकपदासाठी अनेक नावं दिल्यानं कोर्टानं त्यांना फटकारलंय. या यादीमध्ये काही माजी क्रिकेटपटूंचाही समावेश असल्याचंही कोर्टानं म्हटलंय. मात्र, ही नावं जाहीर करण्यात आली नाहीत. यातील काही नावं यादीतून वगळण्यात येणार असल्याचंही कोर्टानं म्हटलंय.
अॅमिक्स क्युरी यांनी सुचवलेल्या नावांमध्ये काहींचे वय हे 70 वर्षाहून अधिक आहे, त्यामुळे यातून काही नावं वगळण्यात येणार असल्याची शक्यता आहे. बीसीसीआयचा कारभार सध्या अध्यक्ष आणि सचिवाविना सुरु आहे. कोर्टानं अनुराग ठाकूर आणि अजय शिर्केंची हकालपट्टी केल्यानंतर आता बीसीसीआयचा कारभार या प्रशासकपदासाठी सुचवलेल्या नावांमधूनच काहीजण चालवतील.