बिग बींनी गायलं राष्ट्रगीत
टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली आहे. कोलकत्याच्या इडन गार्डन मैदानामध्ये ही मॅच झाली. या मॅचला अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली.
कोलकता: टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली आहे. कोलकत्याच्या इडन गार्डन मैदानामध्ये ही मॅच झाली. या मॅचला अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली.
सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांनी भारताच्या विजयानंतर मोठा जल्लोष केला. अमिताभ बच्चन तर या विजयानंतर भारताचा तिरंगा घेऊन सेलिब्रेशन करत होते.
पण मॅच सुरु व्हायच्या आधी अमिताभ बच्चन यांनी इडन गार्डनमधल्या हजारो प्रेक्षकांसमोर राष्ट्रगीत गायलं, आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. अमिताभ यांच्या या राष्ट्रगीतावेळी इडन गार्डनवर एक वेगळाच माहोल तयार झाला होता.
अमिताभ यांनी गायलं राष्ट्रगीत, पाहा व्हिडिओ