मुंबई : सध्या क्रिकेट, वाद आणि अमिताभ बच्चन यांचं जणू नातंच झालंय. रविवारी रात्री भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याआधी इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू फ्लिंटॉफने एक ट्वीट केलं ज्यात त्याने सामन्यात हिरो ठरलेल्या विराट कोहलीची खिल्ली उडवली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ट्वीट वाचून अमिताभ बच्चन भडकले. त्यांनी त्या ट्विटला उत्तर देण्याचं ठरवलं आणि हिंदीतून सडेतोड उत्तर दिलं. 'रूट से उखाड देंगे' असं उत्तर त्यांनी फ्लिंटॉफला दिलं.



अमिताभ इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी विराटचं कौतुक करण्यासाठी आणखी दोन ट्विट्स केली आणि विराटचं गुणगान गायलं. फ्लिंटॉफने त्यावर 'आपण कोण?' असा प्रश्न विचारला खरा... पण, त्याला योग्य ते उत्तर मिळालं होतं.