पुणे : टीम इंडियाचे प्रशिक्षकपदाची सूत्रे अनिल कुंबळे यांच्याकडे आल्यानंतर संघाची कामगिरी दिवसेंदिवस बहरत चाललीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडविरुद्ध वनडे सिरीजआधी कुंबळेने भारतीय संघाचे कौतुक केलेय. भारतीय संघ चांगला प्रतिस्पर्धी असल्याचे म्हटलेय. युवराजच्या कमबॅकने संघ संतुलित झालाय. त्यामुळे मधल्या फळीत जागा मिळवण्यासाठी चुरसही वाढलीये.


यावेळी युवराजच्या येण्याने रहाणेला पहिल्या फळीत स्थान देणार असल्याचेही कुंबळे म्हणाला. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये रहाणे सलामीवीराची भूमिका करु शकतो असेही संकेत दिलेत. त्यामुळे सलामीला रहाणेसह लोकेश राहुल दिसू शकतो. 


युवराज, धोनी, मनीष पांडे आणि केदार जाधव यांच्या उपस्थितीत रहाणेला मधल्या फळीत खेळणे कठीण आहे. त्यामुळे तो पहिल्या फळीत खेळू शकतो. रहाणेने इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात ९१ धावांची शानदार खेळी केली होती.