अनुजा पाटीलच्या ऑलराऊंडर खेळीने भारताचा श्रीलंकेवर विजय
मराठ मोळ्या अनुजा पाटीलच्या तीन विकेट आणि २२ धावांमुळे भारताने श्रीलंकेचा ३४ धावांनी पहिल्या टी -२० सामन्यात पराभव केला आहे.
रांची : मराठ मोळ्या अनुजा पाटीलच्या तीन विकेट आणि २२ धावांमुळे भारताने श्रीलंकेचा ३४ धावांनी पहिल्या टी -२० सामन्यात पराभव केला आहे.
येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत १३१ धावा काढल्या. यात स्मृती मदाना आणि हरप्रित कौर यांनी प्रत्येकी ३५ आणि ३६ धावा काढल्या. तर अनुजाने नाबाद २२ धावांची खेळी केली.
श्रीलंकेचा डाव ९६ धावांवर गुंडाळला गेला. त्यांच्याकडे दिलानी मनोधरा याने ४४ चेंडूत ४१ धावा केल्या.
अनुजा पाटील हीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.