मुंबई : आज भारत आणि बांग्लादेशमध्ये आशिया कप फायनल होत आहे. बांग्लादेशने दुसऱ्यांदा आशिया कप फायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. पण त्यांना आशिया कप जिंकण्यात अजूनही यश आलेलं नाही. बांग्लादेश समोर भारतीय टीम मजबूत स्थितीत आहे. पण क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. भारतीय टीमकडे मात्र मोठी संधी आहे. भारतीय टीम आयसीसी रँकिगमध्य़े पहिल्या तर बांग्लादेश १० व्या क्रमांकावर आहे. जी टीम चांगली कामगिरी करते ती टीम जिंकते.


२. टी-२० मध्ये दोन्ही टीममध्ये ३ वेळा मॅच झाल्या आहेत आणि तिनही मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे. 


३. वनडे फॉरमॅटमध्ये दोघांमध्ये ३१ वेळा सामने झाले आहेत ज्यामध्ये भारताने २६ तर बांग्लादेशने ५ मॅच जिंकले आहेत. एक मॅच रद्द झाली होती.


४. आशिया कपमध्ये भारत-बांग्लादेश एकमेकांसमोर १० वेळा आले आहेत पण यामध्ये देखील भारताने ९ मॅचमध्ये बाजी मारली आहे. 


५. बांग्लादेशमध्ये भारताने त्यांच्याच धरतीवर एकूण २२ मॅचपैकी १७ मॅच जिंकले आहेत. बांग्लादेशने ४ वेळा विजय मिळवला आहे.