कुआंटन, मलेशिया : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचे हॉकी संघ आमनेसामने येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने सेमीफायनलमध्ये कोरियाला हरवत अंतिम फेरी गाठली. निर्धारित वेळेत सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात भारताने कोरियाला 5-4 असे हरवले. 


तर दुसरीकडे पाकिस्तानने मलेशियाला हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे या स्पर्धेची फायनल चांगलीच रंगतदार असणार आहे.   


सामन्याची वेळ : संध्याकाळी 6 वाजता