लाईव्ह मॅचदरम्यान पोटात झाली गडबड आणि सोडावे लागले मैदान
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीला गुरुवारपासून सुरुवात झालीये. पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रात अजबच घटना घडली.
पुणे : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीला गुरुवारपासून सुरुवात झालीये. पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रात अजबच घटना घडली.
डेविड वॉर्नरच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात पहिला धक्का बसला. मात्र त्यानंतर ३८ धावांवर खेळणाऱ्या रेनशॉनेही मैदान सोडले. त्याच्या अचानक मैदान सोडून जाण्याने उपस्थित क्रिकेट चाहते, कमेंटेटर आणि सगळेच हैराण झाले.
मात्र काही वेळाने रेनशॉच्या पोटात गडबड झाल्याने मैदान सोडावे लागल्याची माहिती देण्यात आली. डेविड वॉर्नरची विकेट उमेश यादवने घेतल्यानतंर लगेचच रेनशॉने मैदान सोडले. खेळपट्टीवर स्थिरस्थावर झालेले फलंदाज मैदानात नाही आणि अचानकपणे मैदानात ऑस्ट्रेलियाचे दोन्ही नवे क्रिकेटपटू आल्याने त्यांच्या धावगतीवर त्याचा परिणाम झाला.
दरम्यान, पोटातील गडबडीमुळे मैदान सोडावे लागलेल्या रेनशॉची मात्र सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवण्यात आली. या प्रसंगावरुन ट्विटरवर मजेदार ट्विट्स केले जात होते.