मेलबर्न : पाकिस्ताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि १८ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलीये..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानने दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली. पाकिस्तानने पहिला डाव ४४३ धावांवर घोषित केला. त्यामुळे ही कसोटी अनिर्णीत होईल अशी अपेक्षा होती. 


मात्र ऑस्ट्रेलियाची कामगिरी चांगली झाल्याने यजमानांनी या सामन्यातही बाजी मारली आणि दुसरा कसोटी सामना खिशात घालत मालिकेत वर्चस्व मिळवले. 


या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन भूमीवर त्यांना नमवण्याचे स्वप्न मात्र पाकिस्तानी खेळाडूंचे अपूर्ण राहिले. तिसरा कसोटी सामना ३ जानेवारीपासून सुरु होणार आहे.