नवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव यांनी आपले डावपेच टाकत कुस्तीचा आखाडा मारला. बाबा रामदेव यांनी दाखवलेल्या कुस्ती कौशल्याने उपस्थिती प्रेक्षकांची मने जिंकली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योगगुरु बाबा रामदेव यांनी कुस्तीच्या आखाड्यात उतरत ऑलिम्पियन कुस्तीपटूला चितपट केले आहे. प्रो-रेसलिंग लीगच्या आखाड्यात मुंबई आणि पंजाब यांच्यातील सेमीफायनलच्या निमित्ताने बाबा रामदेव यांच्या कुस्तीचं आयोजन करण्यात आले होते.


यावेळी बाबा रामदेव यांच्यासमोर आव्हान होतं ते बीजिंग ऑलिम्पिकचा सिल्व्हर मेडल विजेता कुस्तीपटू आंद्रे स्टॅडनिक याचं. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये स्टॅडनिकनं भारताच्या सुशीलकुमारला नमवत फायनलमध्ये धडक मारली होती. मात्र योगगुरु बाबा रामदेव यांच्याविरोधातल्या मॅचमध्ये स्टॅडनिकला पराभवाचा सामना करावा लागला. 


योगगुरुंनी त्याला 12-0 ने पराभूत केलं. योगागुरू बाबा राम देव यांनी कुस्ती करण्यापूर्वी सूर्य नमस्कार केले. चार पाइंट्सनी त्यांनी आपलं खातं उघडलं. त्यानंतर लगेचच तीन पॉइंट घेत 7-0 अशी आघाडी त्यांनी घेतली. अखेऱच्या क्षणी पाच पाइंट घेत त्यांनी 12-0 असा स्टॅडनिकचा पराभव केला. मॅचनंतर रामदेव बाबा यांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या.