मिरपूर : आशिया कपच्या फायनलला अवघे काही तास उरलेत. मात्र त्यापूर्वी बांगलादेश संघाला मोठा झटका बसलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशचा उपकर्णधार आणि ऑलराउंडर क्रिकेटपटू शाकिब अल हसन सरावादरम्यान दुखापतग्रस्त झालाय. त्यामुळे फायनलमध्ये तो खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे. 


सराव सेशनदरम्यान शाकिबच्या उजव्या जांघेला दुखापत झाली त्यामुळे तो नीट सरावही करु शकला नाही. 


संघाचे फिजिओ बेजेदुल इस्लाम यांनी आशिया कपच्या फायनलमध्ये शाकिब खेळेल अशी आशा व्यक्त केलीये.