नवी दिल्ली : आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाच्या प्रवेशासाठी भारत क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआयने) हिरवा कंदील दिलाय. आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्पर्धेसाठी ८ मेला भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. बीसीसीआयने आयोजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेज हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 


बीसीसीआयच्या माहितीनुसार, बैठकीत सर्वांच्या सहमतीने असा निर्णय घेण्यात आला आहे की आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघ सहभाग घेणार आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी संघ घोषित करण्यासाठी २५ एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. मात्र आयसीसीशी सुरु असलेल्या वादामुळे इंग्लंडमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी भारतीय संघाला न पाठवण्याचा बीसीसीआयचा हेतू होता.


मात्र यामुळे स्थानिक तसेच आयसीसीला यामुळे मोठे नुकसान होणार होते. त्यामुळे अखेर सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने गेल्या गुरुवारी बीसीसीआयला लवकरात लवकर ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यास सांगितले होते. एक जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरूवात होणार आहे. १ जूनपासून १८ जूनपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. ४ जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होईल.