भारतीय टेस्ट खेळाडूंच्या मानधनात दुपटीनं वाढ
भारताच्या टेस्ट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयनं गिफ्ट दिलं आहे. या खेळाडूंच्या मानधनामध्ये दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे.
मुंबई : भारताच्या टेस्ट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयनं गिफ्ट दिलं आहे. या खेळाडूंच्या मानधनामध्ये दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. बीसीसीआयच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
टेस्ट मॅच खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला आता प्रत्येक मॅच खेळल्यावर 15 लाख रुपये मिळणार आहेत. तर बाकावर बसलेल्या खेळाडूंना 7 लाख रुपयांचं मानधन मिळणार आहे. याआधी टेस्ट खेळणाऱ्या खेळाडूंना 7 लाख आणि बाकावर बसलेल्या खेळाडूंना 3.50 लाख रुपयांचं मानधन मिळत होतं.