निधी वाटपाच्या परवानगीसाठी बीसीसीआय कोर्टात
बुधवारपासून सुरू होणाऱ्या इंग्लडविरोधातल्या कसोटी सामन्याआधी निधी वाटपाची परवानगी मिळावी यासाठी BCCIनं सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय.
नवी दिल्ली : बुधवारपासून सुरू होणाऱ्या इंग्लडविरोधातल्या कसोटी सामन्याआधी निधी वाटपाची परवानगी मिळावी यासाठी BCCIनं सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय.
लोढा समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी झाल्याशिवाय राज्याच्या क्रिकेट बोर्डांना निधी वाटप करण्यास कोर्टानं मनाई केलीय.
या पार्श्वभूमीवर उद्या सौराष्ट्र क्रिकेट बोर्डाच्या राजकोटमध्ये इंग्लड विरोधात पहिला कसोटी सामना होणार आहे. त्यासाठी सौराष्ट्र क्रिकेट बोर्डाला निधी देणं गरजेचं आहे असा बीसीसीआयचा युक्तीवाद आहे. त्यामुळे आता उद्याच्या कसोटी सामन्यावर कोर्टाच्या निर्णयाचं सावटं निर्माण झालंय.