बंगळुरु: आयपीएलच्या नवव्या सिझनमध्ये सिक्सची बरसात पाहायला मिळाली. रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये झालेल्या फायनल मॅचमध्ये या आयपीएलमधली सगळ्यात लांब सिक्स पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादच्या बेन कटिंगनं शेन वॉटसनच्या बॉलिंगवर मारलेली ही सिक्स तब्बल 117 मीटर लांब गेली. कटिंगच्या या सिक्सआधी या मोसमात एबी डिव्हिलियर्सनं सगळ्यात लांब सिक्स मारली होती. एबीनं हैदराबादविरुद्धच्या सामन्यामध्ये 111 मीटर लांब सिक्स मारली होती. 


पाहा बेन कटिंगचा लांब सिक्स