हैदराबाद : ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावून पी.व्ही सिंधू आणि तिचे कोच पुलेला गोपीचंद यांचं हैदराबादमध्ये आगमन झालं. तेलंगणा सरकार तर्फे त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती. विमानतळावर अनेक मंत्री तिच्या स्वागतासाठी उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वागतानंतर या दोघांची ओपन डबल डेकर बसमधून हैदराबादमध्ये मिरवणूक काढण्यात येत आहे. त्यासाठी मुबंईतल्या बेस्टची निलांबरी ही बस पाठवण्यात आली आहे. तेलंगणा सरकारनं विशेष विनंती करून ही बस मागवून घेतली आहे.


कालच ही बस हैदराबादला रवाना करण्यात आली होती. साऱ्या देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी बजावणाऱ्या पी व्ही सिंधुच्या स्वागतासाठी मुंबईहून बस पाठवण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचं बेस्टच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय.


सिंधूच्या आई-वडिलांना देखील हैदराबाद सरकाकडून सन्मानित करण्यात येणार आहे.