मुंबई : महाष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि राज्यातील इतर शहरांत होणारे इंडियन प्रिमिअर लीग(आयपीएल)चे सामने राज्याबाहेर हलवले जावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याकडे केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबूक पोस्टद्वारे गुप्ता यांनी मनोहर यांना ही विनंती केली आहे. राज्यात भीषण दुष्काळ आहे. या धर्तीवर आयपीएलचे सामने राज्यात खेळवण्यात येूऊ नयेत. राज्यात दुष्काळ असताना क्रिकेटच्या मैदानातील गवत हिरवेगार ठेवण्यासाठी हजारो लीटर पाणी वापरले जाते, हा पाण्याचा होणारा अपव्यय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


 


त्यांच्या मते महाराष्ट्रात खेळवल्या जाणाऱ्या १९ सामन्यांपूर्वी मैदानातील गवत सुस्थितीत ठेवण्यासाठी सुमारे ७० लाख लीटर पाणी वापरले जाणार आहे.


त्यांनी यासाठी आता भाजपच्या इतर समितींचा आणि पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मागितला आहे. पाण्याशिवाय होळी खेळण्याच्या आवाहनाला लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता यापुढे जाऊन पाणी वाचवण्याचा आणखी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.



९ एप्रिलला मुंबईच्या वानखेडे मैदानात आयपीएलच्या नवव्या मोसमाला सुरुवात होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे.