मुंबई : टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये त्या दोन नो बॉल्समुळे भारत हरला. यावरुन टीम इंडियावर चांगलीच टीका करण्यात आली. त्यानंतर भारताचे माजी गोलंदाज कपिल देव यांनी एकही नोबॉल टाकला नाही अशी माहिती शेअर केली जात होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल देव यांनी निश्चितच चांगली गोलंदाजी केली मात्र त्यांनी क्रिकेट कारकिर्दीत एकही नोबॉल टाकला नाही असे झाले नाही. कपिल यांच्या काळात टी-२० क्रिकेट प्रकार नव्हता. मात्र टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांनी १३१ सामन्यात २० नोबॉल टाकले. 


भारतीय सोशल मीडियावर भलेही कपिल देव यांनी नोबॉल फेकला नसल्याची माहिती फिरत असली तरी टेस्ट क्रिकेटमध्ये ही कामगिरी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आणि ऑलराउंडर इयान बॉथमच्या नावे आहे. त्याने १०२ टेस्ट सामन्यात एकही नोबॉल टाकला नाही. १००हून अधिक टेस्ट सामन्यात एकही नोबॉल न टाकणारा तो एकटा गोलंदाज आहे. 


पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इमरान खान यांनीही ८८ टेस्ट सामन्यात एकही नोबॉल टाकला नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिली यांचा नंबर लागतो.