कॅप्टन कूल धोनीचे झिवासोबत काही क्षण
आपल्या मुलीसाठी तिच्या वडिलांच्या मनात एक वेगळीच जागा असते. तिच्यासाठीचा कोपरा हा वडिलांसाठी नेहमीच हळवा असते.
मुंबई : आपल्या मुलीसाठी तिच्या वडिलांच्या मनात एक वेगळीच जागा असते. तिच्यासाठीचा कोपरा हा वडिलांसाठी नेहमीच हळवा असते.
भारताचा कॅप्टन कूल धोनी सामन्यांच्या वेळापत्रकामुळे कितीही व्यस्त असला तरी आपल्या लाडक्या लेकीसाठी तो वेळ काढतोच. जेव्हा तो घरी परततो तेव्हा अधिकाधिक वेळ आपल्या मुलीसाठी कसा देता येईल याकडे त्याचे लक्ष असते.
नुकताच धोनीची पत्नी साक्षीहिने धोनी आणि झिवाचा एक फोटो ट्विटरवर अपलोड केलाय. धोनी आणि झिवा एकत्र मस्ती करताना त्यात दिसतायत. साक्षीनेही माय लाईफ असं म्हटलंय.