बंगळूरु : आयपीएलच्या दहाव्या हंगामातील अंतिम सामना उद्या मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट यांच्यात रंगणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई आणि पुणे यांच्यात तीन सामने झाले. या तीनही सामन्यात पुण्याने मुंबईवर विजय मिळवला. त्यामुळे या चौथ्या सामन्यात पुणे पुन्हा मुंबईवर भारी पडणार की मुंबई हा इतिहास बदलणार याकडे क्रिकेटचाहत्यांचे लक्ष लागलेय.


दरम्यान, पुण्याविरुद्धचा इतिहास बदलणार असल्याचे मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने म्हटलेय. कोलकाता संघाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर त्याने हे विधान केलेय. 


कोलकाताविरुद्धचा विजय शानदार होता. या विजयामुळे आमचा आत्मविश्वास उंचावलाय. अंतिम सामन्यातही आम्ही अशीच चांगली कामगिरी करु. पुण्याविरुद्धचे आमचे रेकॉर्ड थोडे वेगळे आहेत. मात्र यावेळी आम्ही इतिहास बदलू आणि ट्रॉफी जिंकू, असे रोहित यावेळी म्हणाला.