मुंबई : टी-२० वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात विजयवीर ठरला तो वेस्ट इंडिजचा कार्लोस ब्राथवेट. त्याचे शेवटच्या षटकांतील चार षटकार इंग्लंडला चांगलेच महागात पडले. या सामन्याने ब्राथवेटचे नाव जगभरात पोहोचले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजचा हा विजयवीर आता आयपीएलमध्ये खेळण्यास सज्ज झालाय. यंदाच्या हंगामात तो दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळणार आहे. आयपीएलचा लिलाव वर्ल्डकप सामन्यापूर्वी झाला. त्यावेळी त्याचे नाव अधिक चर्चेत नव्हते. मात्र आता कहाणी बदलली आहे. ब्राथवेटच्या जबरदस्त फॉर्मचा फायदा यंदा दिल्लीला होणार आहे. ब्राथवेटची भूमिका दिल्ली संघात महत्त्वाची असेल. 


आयपीएलमध्ये ब्राथवेटची बेस प्राईज ३० लाख रुपये होती. मात्र लिलावादरम्यान त्याला चार कोटीहून अधिक बोली लागली. तब्बल ४.२ कोटींना दिल्लीच्या संघाने ब्राथवेटला खरेदी केले. यावरुन असे समजते की वर्ल्डकपआधीच ब्राथवेटची क्षमता क्रिकेट एक्सपर्ट यांनी ओळखली होती.