बंगळुरु: वेस्ट इंडिज आणि रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरचा विस्फोटक खेळाडू क्रिस गेलचा तोल पुन्हा ढळला आहे. ब्रिटीश वृत्तपत्र टाईम्सच्या महिला पत्रकार चारलोट एडवर्ड्सना सेक्सबद्दल गेलनं अश्लिल प्रश्न विचारले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझ्याकडे जगातली सगळ्यात मोठी 'बॅट' आहे, तुला ती उचलायला दोन हात लागतील असं गेल म्हणाला आहे. तसंच तु थ्रीसम सेक्स केला आहेस का, आत्तापर्यंत किती कृष्णवर्णीय पुरुषांबरोबर तु सेक्स केलास असे अश्लिल प्रश्न गेलनं या महिला पत्रकाराला विचारले.


हजारो मुली माझ्या फॅन आहेत, त्या एका क्षणात माझ्यावर झोकून देतात, कारण मी चांगला दिसतो, असंही गेल म्हणाला आहे.


महिला पत्रकरांबरोबर असभ्या वागायची ही क्रिस गेलची काही पहिली वेळ नाही, याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रेजेंटरला फ्लर्ट केल्यामुळे त्याला ७००० डॉलरचा दंड ठोठावण्यात आला होता.


बिग बॅशमध्ये 15 बॉलमध्ये 41 रन केल्यानंतर ही महिला प्रेजेंटर गेलला प्रश्न विचारायला गेली, तेव्हा तुला पाहण्यासाठी मी ही खेळी केली. मला तुझी मुलाखत घ्यायची होती, आज मॅचनंतर आपण ड्रिंक्स घ्यायला जाऊ असं गेल कॅमेरासमोर म्हणाला होता.