मुंबई : क्रिस गेलसाठी आयपीएल २०१६ काही चांगली नव्हती. त्याला काही चांगली खेळी करता आली नाही. पण नेहमी विवादामध्ये राहणाऱ्या गेलवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजचा ओपनर गेल आपल्या मागच्या चुकांपासून सुधारतांना काही दिसत नाही आहे. त्याने पुन्हा एकदा नव्या विवादाला जन्म दिला आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत हे ३ देश गेलवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.


गेलने बिग बॅश लीग २०१५ मध्ये एका टीव्ही अँकरसोबत विचित्र संभाषण केलं होतं त्यामुळे त्यावर टीका झाली होती पण आता त्याने पुन्हा एकदा नव्या ववादाला वाचा फोडली आहे. गेलने एक ब्रिटीश पत्रकार शेर्लोट एडवर्ड्ससोबत ही काही अश्लिल गोष्ट केली आहे. 


आयपीएलचे चेअरमेन राजीव शुक्ला यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय देखील गेलवर कारवाई करु शकते असं म्हटलं आहे.



गेलने ब्रिटीश पत्रकार शेर्लोट एडवर्ड्सला म्हटलं होतं की, माझ्याकडे एक मोठी बॅट आहे, जगातील सर्वात मोठी बॅट, तु तिला उचलू शकतेस का ? तुला दोन्ही हातांनी ती उचलावी लागेल.' गेलने नंतर म्हटलं की हे मी मस्करीमध्ये म्हटलं होतं.


खेळाडुंच्या अशा बोलण्यामुळे आणि वागण्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. खेळाडूंनी मर्यादा पाळल्या पाहिजेत. याबाबत मी बीसीसीआय अध्यक्ष आणि सचिवांशी बोलेल असं देखील राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे. बीसीसीआयला लेखी स्वरुपात तक्रार मिळाली तर बीसीसीआय कारवाई करेल असं बीसीसीआयने म्हटलं आहे. त्यामुळे आता गेलवर काय कारवाई होते हे पाहावं लागेल.