कोहली आणि धोनीबद्दल असं बोलला हार्दिक पांड्या
धर्मशालामध्ये आपली पहिली वन डे खेळणारा आणि मॅन ऑफ द मॅच खिताब मिळविणारा हार्दिक पांड्याच्या मते तो दबाव असताना चांगली कामगिरी करू शकतो. याची प्रेरणा मला महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्याकडून मिळते.
रांची : धर्मशालामध्ये आपली पहिली वन डे खेळणारा आणि मॅन ऑफ द मॅच खिताब मिळविणारा हार्दिक पांड्याच्या मते तो दबाव असताना चांगली कामगिरी करू शकतो. याची प्रेरणा मला महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्याकडून मिळते.
रांचीमध्ये न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पांड्याने पत्रकारांशी बोलताना आपल्या सिनिअर खेळाडूंची स्तुती केली. जेव्हा ते दोन्ही (धोनी-कोहली) फलंदाजी करतात तेव्हा खूप शिकायला मिळतं. त्यांची फलंदाजी आणि रनिंग बिटविंद विकेट आम्हांला प्रेरित करते. दोघांना एकत्र फलंदाजी करत पाहणे खूप मजेशीर असते.
कोहलीने नाबाद १५४ आणि धोनी ८० यांनी तिसऱ्या विकेटसाठी १५१ धावा केल्या होत्या.