नवी दिल्ली : नव्याने क्रिकेट विश्वात पदार्पण केलेल्या ओमानच्या संघातील बॉलर मुनिस अन्सारी एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलाय. कारण आहे, लसिथ मलिंगा. कारण अन्सारी त्याच्याप्रमाणे बॉल टाकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओमान आणि आयर्लंड यांच्यात आयसीसी टी-२० विश्वचकाच्या पात्रता फेरीत आयर्लंडचा धक्कादायक पराभव झाला. ओमानने दोन विकेट राखत आयर्लंडवर विजय मिळवला आहे. ओमानने मिळवलेल्या या विजयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. विश्वचषकात हा त्यांच्या पदार्पणाचा सामना होता. या संघातील बॉलर अन्सारी आता चांगलाच चर्चेत आलाय.


श्रीलंकेचा फास्टर बॉलर लसिथ मलिंगा याच्याप्रमाणे अन्सारी बॉलिंग करतो. अन्साही हा भारतीय आहे. तो मूळचा भारतीय आहे. त्याला भारतीय टीमकडून खेळायचे होते. मात्र, त्याला गॉडफादर न मिळाल्याने तो संघात स्थान पटकावू शकला नाही. तो सांगतो मी माझ्या हिमतीवर हे स्थान पटकावलेय.


पाहा हा व्हिडिओ :