मुंबई : क्रिकेट विश्वात असा कोणीही नसेल की विराट कोहलीला ओळखत नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर अॅडम जाम्पा ज्याच्याकडे शेन वॉर्न म्हणून पाहिले जाते त्यानेच विराट कोहलीला ओळखत नाही असे म्हटले. ऑस्ट्रेलियन युवा गोलंदाज अॅडम जाम्पाने विचारले कोण आहे विराट कोहली?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यात शुक्रवारी सामना झाला. धोनीच्या नेतृत्वाखाली रायझिंग पुणे सुपरजायंट्स टीमकडून जाम्पा खेळत आहे. त्याने सोशल मीडियावर विराट कोहली आणि एबी डी विलियर्स यांची खिल्ली उडवली. जाम्पाने केन रिचर्ड्सनला विचारले कोण आहे हे?


केन रिचर्डसनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर दोन्ही दिग्गज खेळाडूंचे कोतुक केले. तसेच फोटोही अपलोड केला. रिचर्डसनने ट्विट केले, या दोन खेळाडूंना जवळून खेळताना पाहण्याचे  भाग्य मिळाले. यावर जाम्पाने म्हटले कोण आहे हे? यावर रिचर्डसनने म्हटले इशांत शर्माला विचार?