मुंबई : ऑस्ट्रेलियाचा स्फोटक बॅट्समन डेविड वॉर्नरने वर्षाच्या सुरुवातीलाच एक इतिहास रचला आहे. पाकिस्तानविरोधात त्याने मंगळवारी सिडनी टेस्टमध्ये पहिल्या दिवशी लंचच्या आधी शतक ठोकलं आहे. असं करणारा तो जगातील पाचवा क्रिकेटर ठरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॉर्नर हा कारनामा करणारा ऑस्ट्रेलियाचा चौथा बॅट्समन बनला आहे. पण पहिल्यांदा हे ऑस्ट्रेलियामध्ये झालं आहे.  वॉर्नरने पहिल्या सत्रात शेवटच्या ओव्हरमध्ये तीन रन घेतले आणि शतक पूर्ण केलं.


७८ बॉल्समध्ये त्याने १७ चौकारच्या मदतीने शतक पूर्ण केलं. असा कारनामा ४२ वर्षापूर्वी झाला होता. पाकिस्तानच्या माजिद खानने कराचीमध्ये न्यूजीलंड विरोधात ३० ऑक्टोबर १९७६ मध्ये हा कारनामा केला होता.


सर्वात आधी ऑस्ट्रेलियाच्या विक्टर ट्रंपरने 1902 मध्ये ओल्ड ट्रेफर्डमध्ये  इंग्लंड विरोधात हा कारनामा केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाटा चार्ल्स मॅकार्टनीने हॅडिग्लेमध्ये १९२६ मध्ये, सर डॉन ब्रॅडमन यांनी १९३० मध्ये हा कारनाम केला होता. त्यानंतर माजिद खानने १९७६ मध्ये हा कारनामा करुन दाखवला होता.