मुंबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक आणि दीपा कर्माकरला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते बीएमडब्ल्यू कार बक्षीस म्हणून देण्यात आली होती. हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. चामुंडेश्वरनाथ यांच्यातर्फे या तिघींना ही कार भेट देण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण दीपा कर्माकरनं ही कार परत द्यायचा निर्णय घेतला आहे. ही कार परत देण्याबाबत दीपानं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बीएमडब्ल्यूसारख्या महागड्या कारचा मेन्टेनन्स ठेवणं कठीण आहे, तसंच आगरतलासारख्या छोट्या शहरात बीएमडब्ल्यू चालवणं कठीण असल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितल्याचं बोललं जात आहे.