रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएलमधून होणार आऊट ?
यंदा आयपीएल सीझन ९ ला दिमाखदार सुरुवात झाली. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन संघ बाद झाल्याने दोन नवीन संघ देखील या सीझनमध्ये आले पण याच संघामध्ये देशातील सार्वजनिक आणि खासगी बॅंकांना तब्बल नऊ हजार कोटींचा चुना लावणारे उद्योगपती विजय माल्ल्यांचा रॉयल चॅलेंजर्स संघ ही आहे.
औरंगाबाद : यंदा आयपीएल सीझन ९ ला दिमाखदार सुरुवात झाली. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन संघ बाद झाल्याने दोन नवीन संघ देखील या सीझनमध्ये आले पण याच संघामध्ये देशातील सार्वजनिक आणि खासगी बॅंकांना तब्बल नऊ हजार कोटींचा चुना लावणारे उद्योगपती विजय माल्ल्यांचा रॉयल चॅलेंजर्स संघ ही आहे.
इंडियन प्रिमियम लीगमधून माल्ल्यांचा संघ बाद करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी आता २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
देशातील बॅंकांना नऊ हजार कोटी रुपयांचा गंडा घातल्यानंतर मल्ल्यांनी देश सोडून इंग्लंडमध्ये पलायन केले. लुकआऊट नोटीस असतानाही माल्याने देश सोडला. सक्तवसुली संचालनालयाने समन्स बजावल्यानंतरही मल्ल्या हजर राहिले नाही. मनी लॉंड्रिंगप्रकरणासह फसवणुकीचे गंभीर आरोप त्यांच्याविरोधात आहे. हेतुपूर्वक त्यांनी सतरा बॅंकांना गंडा घातला आहे.
आयपीएलच्या माध्यमातून रॉयल चॅलेंजर्स हा संघ घसघशीत कमाई करत आहे. रॉयल चॅलेंजर्सला आयपीएलमधून हद्दपार करावे, अशी विनंती करणारी जनहित याचिका नांदेड जिल्ह्यातील नारायण गायकवाड यांनी दाखल केली आहे.