नवी दिल्ली : दिल्ली डेयरडेविल्सने जबरदस्त खेळाच्या जोरावर फिरोजशाह कोटला मैदानावर इंडियन प्रीमियर लीग च्या २६ व्या मॅचमध्ये कोलकाता नाईट राइर्ड्सला २७ रन्सने हरवलं. दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये आता दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. दिल्लीने कोलकातासमोर १८७ रन्सचं आव्हान ठेवलं होतं. रॉबिन उथप्पाने अर्धशतक झळकावलं पण तरी त्यांना फक्त १५९ रन्स पर्यंतच पोहोचता आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीने ६ पैकी ४ मॅच जिंकल्या आहेत तर कोलकाताने ७ पैकी ४ मॅच जिंकल्या आहेत. कोलकात्याची सुरुवाती चांगली नाही झाली ज्यामुळे त्यांना पराभव स्विकारावा लागला. 


सुनील नारायणने ४ आणि उमेश यादवने २ विकेट घेतले तर दिल्लीकडून कार्लोस ब्रॅथवेट आणि जहीर खानने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.