कटक : इंग्लंड विरूद्ध दुसऱ्या सामन्यात युवराज सिंग (१५०) आणि महेंद्रसिंग धोनी ( १३४) धावांची खेळी करत ३८१ धावांचा डोंगर रचला, या सामन्यात अनेक विक्रम झाले. टाकू या त्यावर एक नजर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१) युवराजने या सामन्यात १५० धावांची खेळी केली. यापूर्वी त्याने २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध १३९ धावांची खेळी केली होती. 


२) युवराज आणि धोनीने चौथ्या विकेटसाठी २५६ धावा जोडल्या. 


३) इंग्लंड विरूद्ध हा कोणत्याही संघाचा चौथ्या विकेटसाठी विक्रम आहे. 


४) ही वन डेतील चौथ्या विकेटसाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावांची भागिदारी आहे. 


५) या दोघांनी वन डेमध्ये दहाव्यांदा शतकी खेळी केली आहे. ही पाचवी भारतीय जोडी आहे, ज्यांनी दहा वेळा शतकीय भागीदारी केली आहे. सौरव गांगुली आणि तेंडुलकरने सर्वाधिक २६ वेळा शतकीय भागीदारी केली आहे. 


६) धोनीने भारताच्या भूमीवर ४००० धावा करण्याचे विक्रम केला. यापूर्वी सचिन तेंडुलकरने हा विक्रम केला आहे. त्याच्या नावावर ६९७६ धावा आहे. त्यामुळे धोनी अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज आहे.