रांची: रांचीमध्ये झालेल्या टी-20 मध्ये भारतानं श्रीलंकेचा दारुण पराभव करत सीरिजमध्ये कमबॅक केला. या विजयाबरोबरच कॅप्टन धोनीच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. टी-20 मध्ये 30 मॅच जिंकणारा धोनी पहिला कॅप्टन ठरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्तापर्यंत टी-20 मध्ये धोनीनं भारताचं 56 मॅचमध्ये नेतृत्व केलं आहे. यातल्या 30 मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे, तर 24 मॅचमध्ये भारताचा पराभव झाला आहे, आणि एक मॅच टाय तर एका मॅचचा निर्णयच लागला नाही.


धोनीच्या नंतर दुसरा नंबर लागतो तो आयर्लंडचा कॅप्टन विलियम पोर्टरफिल्डचा. पोर्टरफिल्डच्या नेतृत्वात आयर्लंडनं 43 मॅचमध्ये 23 विजय मिळवले. तर वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सामीच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजची टीम 22 वेळा विजयी झाली आहे. 


टी-20मध्ये सगळ्यात जास्त मॅचमध्ये कॅप्टनशिप केल्याचा रेकॉर्डही धोनीच्या नावावर आहे.