कटक : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये महेंद्रसिंग धोनीनं सेंच्युरी झळकावली आहे. वनडे क्रिकेटमधली धोनीची ही दहावी सेंच्युरी आहे. या खेळीवेळी धोनीनं वनडे क्रिकेटमधली 200वी सिक्स मारली आहे. वनडे क्रिकेटमध्ये 200 सिक्स मारणारा पहिला भारतीय ठरला आहे. सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये धोनी आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनडे क्रिकेटमध्ये शाहिद आफ्रिदीनं सर्वाधिक 351 सिक्स मारल्या आहेत, तर सनथ जयसूर्यानं 270 सिक्स मारल्या आहेत. या यादीमध्ये वेस्ट इंडिजचा क्रिस गेल 238 सिक्स मारून तिसऱ्या क्रमांकावर तर ब्रॅन्डन मॅक्क्युलम 200 सिक्ससोबत पाचव्या क्रमांकावर आहे. भारताकडून सचिन तेंडुलकरनं 195 सिक्स तर 190 सिक्स मारल्या आहेत. या यादीमध्ये सचिन सहाव्या तर गांगुली सातव्या क्रमांकावर आहे.