बीग बी कमेंटेटरवर भडकले, धोनीने केलं शांत
बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये भारताने शेवटच्या बॉलवर विजय साकारला. अत्यंत रोमहर्षक या मॅचनंतर अमिताभ बच्चन मात्र चांगलेच भडकले.
मुंबई: बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये भारताने शेवटच्या बॉलवर विजय साकारला. अत्यंत रोमहर्षक या मॅचनंतर अमिताभ बच्चन मात्र चांगलेच भडकले.
बिग बी अमिताभ बच्चन भारतीय कॉमेंटेट हर्षा यांच्यावर भडकले. भारतीय कॉमेंटेटर्सनी प्रत्येक वेळी दुसऱ्या टीमच्या खेळाडूंविषयी बोलण्यापेक्षा आपल्या खेळाडूंविषयी बोलावं असं ट्विट बिग बींनी केलं.
बिग बींच्या या ट्विटला या मॅचची कॉमेंट्री करणाऱ्या हर्षा भोगलेनं प्रत्युत्तर दिलं आहे. बांग्लादेशच्या या टीममध्ये सर्वोत्तम खेळाडू आहेत, हे मी आधीही म्हंटलं होतं, आणि यानंतरही म्हणीन असं ट्विट हर्षा भोगलेनं केलं आहे.
ट्विटरवर अमिताभ यांच्या फॅन्सनी दिलेल्या प्रतिक्रियांनाही बिग बींनी उत्तर दिलं आहे. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते, आपली टीम आणि आपले खेळाडू चुकीचे दाखवले जातात, हे निराशाजनक आहे. दुसऱ्या देशाचे कॉमेंटेटर्स आपल्या खेळाडूंविषयी काय म्हणतात हे एकदा पाहा, असं बिग बी म्हणाले आहेत.
यानंतर भारताचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी हे ट्विटर युद्ध शांत करण्याचा प्रयत्न केला. यावर धोनीने म्हटलं की ट्विटरवर यावर अजून काही बोलू नका असं म्हटलं आणि अमिताभ यांचं ट्विट त्यासोबत शेअर केलं.