धोनी म्हणतो, 'विराटने मला पैसे द्यायला हवेत'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहाली : 'विराटच्या धावा पूर्ण करण्यासाठी मी दुसऱ्या बाजूने प्रयत्न केल्यामुळे विराटने मला पैसे द्यायला हवेत', असं टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने म्हटले आहे.


वेगाचा बादशहा उसेन बोल्टनेही महेंद्रसिंह धोनीच्या जलद धावण्याचे कौतुक केलेले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयात अभूतपूर्व फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीने धावा काढताना धोनीलाही मागे टाकले होते. 


विराटच्या धावण्याच्या कौशल्याचे कौतुक करताना धोनी हसत हसत म्हणाला,  'विराटच्या धावा पूर्ण करण्यासाठी मी दुसऱ्या बाजूने प्रयत्न केल्यामुळे विराटने मला पैसे द्यायला हवेत'


धोनी गंमत करत असला, तरी त्यांची भागीदारी अवाक्‌ करणारी होती. तंदुरुस्तीच्या आघाडीवर कोहली कर्णधाराच्या एक पाऊल पुढेच होता. धोनीने गमतीने मी धावत होतो, म्हणून विराटच्या धावा पूर्ण झाल्या, त्याने मला याचे पैसे द्यायला हवेत, असे सांगितले. 


भारताच्या विजयात कोहली आणि धोनी यांची नाबाद ६७ धावांची भागीदारीदेखील निर्णायक होती. त्यांचे धावा काढण्याचे तंत्र अफलातून होते. धाव नसताना एकेरी आणि एकेरी धाव असताना दुहेरी असा सपाटा या जोडीने लावला होता.