१३ वर्षानंतर धोनीने केला रेल्वेने प्रवास, जुन्या आठवणींना दिला उजाळा
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने १३ वर्षानंतर ट्रेनने प्रवास केला आहे. विजय हजारे ट्रॉफीसाठी तो झारखंड टीमचं नेतृत्व करणार आहे. धोनी संपूर्ण टीमसोबत कोलकातासाठी मंगळवारी रात्री ट्रेनने रवाना झाला. या दरम्यान धोनीने त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने १३ वर्षानंतर ट्रेनने प्रवास केला आहे. विजय हजारे ट्रॉफीसाठी तो झारखंड टीमचं नेतृत्व करणार आहे. धोनी संपूर्ण टीमसोबत कोलकातासाठी मंगळवारी रात्री ट्रेनने रवाना झाला. या दरम्यान धोनीने त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
धोनीने म्हटलं की, 'कधी मी जनरल डब्यातून प्रवास करत होतो. १३ वर्षानंतर ट्रेनने प्रवास करतोय. प्रवास लांबचा आहे खूप मज्जा येईल. टीमच्या इतर खेळाडूंशी गप्पा मारेल, खूप मज्जा करेल. जेव्हा मी खडगपूरमध्ये टीटीई होतो तेव्हा ट्रेनिंगसाठी अनेकदा जमशेदपूरमधील रेल्वे ट्रेनिंग स्कूलमध्ये येत होतो.' अशा प्रकारे धोनीने टीमच्या खेळाडूंसोबत अनेक जुन्या आठवणी शेअर केल्या.