मुंबई: टी-20 वर्ल्ड कपला भारतामध्ये सुरुवात झाली आहे. 2007 मध्ये टी-20 चा पहिला वर्ल्ड कप झाला, त्यानंतर गेल्या 9 वर्षांमध्ये क्रिकेटच्या या फॉरमॅटला प्रचंड लोकप्रियता मिळाली. गेल्या 9 वर्षांमध्ये आत्तापर्यंत 5 टी 20 वर्ल्ड कप झाले, त्यापैकी पाचही वेळा वेगवेगळ्या टीम हा वर्ल्ड कप जिंकल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या 9 वर्षांमध्ये अनेक खेळाडूंनी टी20 मध्ये आपला ठसा उमटवला. मागच्या 9 वर्षांचा अभ्यास केला तर जगातली सर्वोत्तम टी 20 टीम कोणती असेल यावर एक नजर टाकूयात. 


ख्रिस गेल



क्रिकेटमधला सगळ्यात विस्फोटक बॅट्समन म्हणजे ख्रिस गेल. समोर कोणातही बॉलर असला तरी त्याची पिसं काढणाऱ्या ख्रिस गेलनं टी-20 क्रिकेटमध्येही आपला ठसा उमटवला आहे. 


ब्रॅन्डन मॅक्कलम



आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रॅन्डन मॅक्कलमनं निवृत्ती घेतली असली, तरी ख्रिस गेल बरोबर मॅक्कलम बॅटिंगला आला तर बॉलर्सचं मात्र खरं नाही, हे निश्चित.


विराट कोहली



टेस्ट असो वा वनडे किंवा टी 20 क्रिकेटच्या सगळ्या फॉर्मेटमध्ये आत्ताचा सर्वोत्तम खेळाडू म्हणजे विराट कोहली. त्यामुळे या ड्रीम टीममध्ये विराट कोहलीला 3 नंबरवर बॅटिंगला ठेवण्यात कोणीही संशय घेणार नाही. 


युवराज सिंग



पहिल्याच टी 20 वर्ल्ड कपमध्ये युवराजनं आपला इम्पॅक्ट टी 20 क्रिकेटवर ठेवला. इंग्लंडविरुद्ध 6 बॉलमध्ये 6 सिक्सचं रेकॉर्ड असो किंवा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमी फायनलमधली मॅच विनिंग खेळी असो, युवराज एक हाती मॅच जिंकवून देवू शकतो, हे त्यानं सिद्ध केलं आहे. 


ए.बी.डिव्हिलियर्स



दक्षिण आफ्रिकेचा हा स्टार बॅट्समननं प्रत्येक फॉरमेटमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. डिव्हिलियर्स बॅटिंग करत असताना कोणातही स्कोर अशक्य वाटत नाही. 


कायरन पोलार्ड



वेस्ट इंडिजच्या या बॅट्समननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हणावी तशी कामगिरी केली नाही. पण आयपीएल किंवा बिग बॅशमध्ये त्यानं स्वत:ला सिद्ध केलं आहे. शेवटच्या काही ओव्हरमध्ये जेव्हा हाणामारी करायची असते तेव्हा पोलार्डसारखा खेळाडू क्वचितच सापडेल. 


एम.एस.धोनी (कॅप्टन)



या ड्रीम टीमचं नेतृत्व एम.एस.धोनीपेक्षा कोण चांगलं करु शकेल. 2007 पासून धोनी भारतीय संघाचा कॅप्टन आहे. त्याच्या नेतृत्वामध्ये भारतानं अनेक ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. 


आर.अश्विन



टी-20 क्रिकेटमधला सर्वोत्तम स्पिन बॉलर म्हणजे आर.अश्विन. आयसीसी रँकिंगमध्येही अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसंच कठीण वेळी बॅटिंगमध्येही अश्विननं अनेक वेळा स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यामुळे या टीममध्ये स्पिनरची जबाबदारी अश्विन पार पाडू शकतो. 


मिचेल स्टार्क



150 च्या स्पीडनं प्रत्येक बॉल टाकायची क्षमता, त्यातच यॉर्कर सारखं अस्त्र असलेला बॉलर म्हणजे ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क. विरोधी टीमच्या बॅट्समनमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी स्टार्क हा नक्कीच महत्त्वाचा खेळाडू आहे. 


उमर गुल



पाकिस्तानच्या या फास्ट बॉलरच्या निवडीविषयी कदाचित प्रश्न उपस्थित होतील. पण स्वत:च्या दिवशी उमर गुलनं एक हाती पाकिस्तानला मॅच जिंकवून दिल्या आहेत. 


लसिथ मलिंगा



टी 20 क्रिकेटमध्ये सगळ्यात प्रभावी बॉलर म्हणजे लसिथ मलिंगा. यॉर्कर असो किंवा बाऊंसर मलिंगाच्या वेगळ्या ऍक्शनमुळे बॅट्समनना त्याचे बॉल खेळणं कायमच मुश्किल होतं.