बंगळुरू :  ऑस्ट्रेलियाचा कोच डॅरन लिमनने आज भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या आरोपांना फेटाळले आहे, की त्यांची टीम ड्रेसिंग रूममधून डीआरएसवर वारंवार संकेत देण्याचे प्रयत्न करत होते. दुसरी टेस्ट योग्य भावनने खेळली गेली यावर पुन्हा लिमनने जोर दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरूमध्ये भारताने विजय मिळविल्यावर सिरीज बरोबरीत आणली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मीडियाशी बोलताना लिमनने कोहलीच्या वादग्रस्त विधानाबद्दल बोलताना सांगितले, की नाही, कधीच नाही हे ऐकून खूप हैराण व्हायला होते आहे. असे झाले हे विराट कोहलीचा दृष्टीकोन आहे.  आमचा दृष्टीकोन वेगळा आहे. आम्ही हा सामना योग्य भावनेने खेळला. आम्ही ज्या पद्धतीने खेळू इच्छित होतो. त्यानुसार आम्ही बदल केले, आमची टीम नवी आहे. आम्ही जी कामगिरी करत आहे, त्यावर खूप संतुष्ट आहे. 


ऑस्ट्रेलिया टीमने दोन वेळा चिटींग केली... 


मॅचनंतर काल झालेल्या पत्रकार परिषदेत कोहली म्हणाला की, ऑस्ट्रेलियाच्या संघाला एकदा नाही दोन वेळा डीआरएस रेफरलवर ड्रेसिंग रूममधून मदत घेताना पाहिले. 


लिमनने कोहलीच्या आरोपांवर आपल्या टीमने आक्रमक प्रतिक्रिया न दिल्याबद्दल संघाचे कौतुक केले.  आम्ही ज्या पद्धतीने खेळलो त्याचा आम्हांला गर्व आहे. भले आम्ही पराभूत झालो असले. 


 



 


स्मिथ धोकेबाज आहे... 


दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी स्मिथला पायचित दिल्यानंतर तो ड्रेसिंग रूमकडे पाहताना सापडला आणि त्याच ठिकाणी स्थिती हाताबाहेर गेली. स्मिथ असे करत असताना अंपायरच्या दिशेने धावून जाणाऱ्या कोहलीने म्हटले की, मी जेव्हा फलंदाजी करत होतो, तेव्हा दोन वेळा स्मिथला असे करताना पाहिले. 


कोहली म्हणाला, की मी अंपायरला सांगितले की असे करताना स्मिथला दोनदा पाहिले. डीआरएस घेण्यापूर्वी त्यांच्या खेळाडूंना मी दोन वेळा ड्रेसिंग रूमकडे पाहताना हेरले. त्यामुळेच अंपायरने स्मिथला डीआरएस घेऊ दिला नाही आणि पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला. 


भारतीय कर्णधाराने स्मिथला धोकेबाज म्हटले नाही पण माजी कर्णधार कपील देव आणि सुनील गावस्कर यांनी स्मिथने खेळ भावनेच्या विरूद्ध काम केल्याचे म्हटले.