भारत वि इंग्लंड पहिल्या कसोटीत होणार डीआरएसचा वापर
पुढील आठवड्यात सुरु होत असलेल्या भारत वि इंग्लंड कसोटी सामन्यात पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर डीआरएस अर्थात डिसीजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर केला जाणार आहे.
राजकोट : पुढील आठवड्यात सुरु होत असलेल्या भारत वि इंग्लंड कसोटी सामन्यात पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर डीआरएस अर्थात डिसीजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर केला जाणार आहे.
राजकोटच्या मैदानावर 9 नोव्हेंबरपासून भारताची इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी सुरु होणार आहे. बीसीसीआयचा डीआरएसला विरोध होता. मात्र अखेर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत प्रायोगित तत्वावर याचा वापर करण्याला मंजुरी देण्यात आलीये.
द्विपक्षीय क्रिकेट मालिकेत पहिल्यांदाच डीआरएसचा वापर केला जाणार आहे. यापूर्वी 2011च्या वर्ल्डकपमध्ये डीआरएसचा वापर करण्यात आला होता.