मुंबई : वेस्टइंडिजचा क्रिकेटर ऑलराउंडर ड्वेन ब्रावोने मला भारतीचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सारखं बनायचं आहे असं म्हटलं आहे. ब्रावोने धोनीच्या कर्णधारपदाचं कौतूक करत तो एक शानदार खेळाडू असल्याचं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रावोने त्याच्या इंस्ट्राग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो जॉकी अनुषाला मुलाखत देत आहे. मुलाखतीत जेव्हा त्याला प्रश्न विचारला की, 'जर तुला कोणत्या खेळाडू सारखं बनण्याची संधी मिळाली तर तू कोणत्या खेळाडू सारखं बनशील?'


या प्रश्नाचं उत्तर देतांना त्याने म्हटलं की, तो महेंद्र सिंह धोनी सारखा बनू इच्छितो. धोनी कॅप्टन कूल बरोबरच शानदार खेळाडू आहे.


धोनी आणि ब्रावो आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स कडून एकाच टीममध्ये खेळत होते. आयपीएल १० मध्ये तो गुजरात लायंसकडून खेळत आहे. दुखापतीमुळे तो सामना नाही खेळू शकला. गुजरात आता प्ले ऑफमधून बाहेर झाली आहे.